2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' आज ही लोकांच्या मनात जागा तयार करून आहे. या चित्रपटाची क्रेज आजही तितकीच पाहायला मिळते. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव, परेश रावल, अमिशा पटेल, विक्रम गोखले यांसारख्या कलाकारांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. यानंतर कालांतराने 'भूल भुलैया'चा २०२२ साली दुसरा भाग आला ज्यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल, अमिशा पटेल, विक्रम गोखले यांच्या ऐवजी कार्तिक आर्यन, कियारा अदवानी आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. 'भूल भुलैया 2' नंतर 'भूल भुलैया 3' च्या मागण्या प्रेक्षकांकडून येऊ लागल्या आणि नुकताच 'भूल भुलैया 3' चा भन्नाट आणि थरकाप उडवणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस 1 नोव्हेंबंरला आला आहे. आणि या चित्रपटाने 75 कोटींपर्यंत बॉक्स ऑफिसवर कमाई केली केल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटातील "मेरे ढोलना" आणि "हरे राम हरे राम" या दोन गाण्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत
चित्रपटातले कलाकार आणि पात्र: अनीस बज्मी दिग्दर्शीत भूल भुलैया 3 या चित्रपटात महत्त्वाच पात्र आहे तो म्हणजे रुह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यनने साकारलेले रुहान हे पात्र या चित्रपटातील महत्त्वाचे पात्र ठरले आहे. या व्यतिरिक्त तृप्ती डिमरी ही मीरा या पात्रात प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यांच्यासह यात विद्या बालन आणि माधुरी दिक्षीत या दोघी खास आकर्षन ठरल्या आहेत. या दोघींचे पात्र हे सख्या बहिणींचे असून त्यांच्या पात्राचे नाव अंजुलिका आणि मंजुलिका असं आहे. तसेच भूल भुलैया आणि भूल भुलैया 2मध्ये असलेल्या छोटा पंडित या पात्रासाठी राजपाल यादव यांचीच निवड झाली आहे. त्याचसोबत संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, विजय राज हे देखील या चित्रपाटाला परिपुर्ण करत आहेत.
चित्रपटाची कथा: या चित्रपटाची कथा 200 वर्षाआधीची एका घराणेशाहीच्या खुर्चीच्या वादाची आहे. यात सर्व पात्रांचे पुर्नजन्म दाखवण्यात आलेला आहे. विद्या बालन आणि माधुरी दिक्षीत या दोघी बहिणी अंजुलिका आणि मंजुलिकाचा एक लहान भाऊ राजकुमार देवेंद्रनाथ याला मिळालेल्या राज घराण्याच्या खुर्चीच्या मानावरुन ही कथा सुरु होते. सुरुवातीला दाखवण्यात आलेल आहे एक स्त्री चित्रपटाच्या टायटल सॉंगवर नृत्य करत असते आणि अचानक काही लोक तिला जळवतात. ही स्त्री म्हणजे या चित्रपटातील भूताचे पात्र आहे. यानंतर 200वर्षांनंतर या सर्वांचा आढावा घेण्यासाठी रुह बाबा त्याठिकाणी जातो. मात्र त्याला घेऊन येते ती मीरा, एक पैज लावून तो तिथे जातो. यावेळी दोन दरवाजे दाखवलेले आहेत त्यात पहिला दरवाजा उघडल्यामुळे पहिली एन्ट्री ही विद्या बालनची आणि दुसरा दरवाजा उघडल्यामुळे माधुरी दिक्षीतची एन्ट्री होते. यानंतर खरी मंजुलिका कोण आहे याचा शोध लावला जातो.
चित्रपटाचा रिव्ह्यू: चित्रपट हा कुटुंबासोबत पाहणय्सारखा आहे यात विनोदी पात्रांमुळे चित्रपट इन्टरवल आधी विनोदी आहे. मात्र चित्रपटात ससपेन्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. चित्रपटात थरारक आणि थरकाप उडवणारे अनेक सिन पाहायला मिळतील. चित्रपट पैसा वसूल आहे. या चित्रपटात अभिनय देखील फार चांगला पाहायला मिळत आहे. तसेच माधुरी दिक्षीत आणि विद्या बालन या दोघींनी चित्रपटाची सहर उंचवल्याच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला 3.5 इतके रिव्ह्यू मिळाले आहेत.